महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धा चर्‍होलीतच

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड जिल्हास्तरीय महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचेही चर्‍होलीतच आयोजन केले आहे. 26 नोव्हेंबरला होणार्‍या या स्पर्धेसाठी येणार्‍या 18 लाख खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. समितीची साप्ताहिक सभा बुधवारी पार पडली. विषयपत्रिकेवर 22 विषय होते. महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा चर्‍होली-मोशीमध्ये नुकतीच पार पडली. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च आला होता.

आठ गटांत स्पर्धा
ही स्पर्धा आठ गटात होणार आहे. पुरुष आणि महिला गट 21 किलोमीटर, 18 वर्षे मुले आणि मुली शालेय गट सहा किलोमीटर, 16 वर्षे मुले आणि मुली चार किलोमीटर, 14 वर्षे मुले आणि मुली शालेय गट तीन किलोमटर धावणार आहेत. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चर्‍होली गाव ते मोशी ते निगडी स्पर्धेचा मार्ग असणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम दहा क्रमांकापर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. बक्षीसाचे स्वरुप रोख रक्कम, पारितोषिक, ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.