महापौर चषक कुस्ती स्पर्धेची आढावा बैठक

0

पिंपरी : महापालिकेतर्फे आयोजित ‘महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती’ स्पर्धेबाबात आढावा बैठक झाली. ऑक्टोबरमध्ये भोसरी येथे होणार्‍या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील मल्ल सहभागी होणार आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. यावेळी क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे व महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनचे पदाधिकारी, युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे, धनराज करंजवणे आदी उपस्थित होते.