महापौर भाजपचाच करा

0

नागपूर: मुंबईत भाजपचे 82 नगरसेवक निवडूण आले असून 5 नगरसेवकांचा पाठिंबा आहे. इतकी भक्कम परिस्थितीत असताना महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपलाच महापौर बसला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना दिल्ली मुख्यालयातून अमित शहांनी भाजपा नेत्यांना दिल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे भाजपच्या गोटात जोगदार हालचाली सुरू झाल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदार खासदारांची तातडीची बैठक वर्षा बंगल्यावर बोलावली. तर सायंकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली.

शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नाही
शिवसेनेनेही आपल्या पध्दतीने बंडखोरांची घरवापसी करून घेत जुळवाजुळव सुरू केली असून आपली संख्या वाढवत दबाव वाढवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी महापौरपदावरून घोडे अडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. वृत्तवाहीनीवर प्रतिक्रिया देताना मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय दिसत नाही, असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले. शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झाले ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा, असे गडकरी म्हणाले.

झाले गेले विसरून एकत्र यावे
निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झाले ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा.
– नितनि गडकरी, केंद्रिय रस्तेवाहतूक मंत्री

महापौर कुणाचा हे फडणवीस आणि ठाकरे ठरवतील
शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर महापौर कुणाचा असा प्रश्नही गडकरींना विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, प्रत्येकालाच आपला महापौर असावा असं वाटते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मॅच्युअर आहेत, ते योग्य निर्णय घेतील. कारण शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत.

मैत्री ठेवायची असेल तर जबाबदारीने लिहा
भाजप आणि शिवसेना हे वेगळे पक्ष आहेत. दोघांना आप-आपली मते आहेत. मात्र मित्रपक्षाबाबत सातत्याने अपमानित होणारे लिखाण ‘सामना’तून छापणे योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांबाबत सातत्याने आक्षेपार्ह लिखाण केले जाते, ते थांबायला हवे, असे गडकरी म्हणाले. तसेच भाजपने सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर विजय मिळवला हा शिवसेना आणि ‘सामना’चा आरोप चुकीचा असल्याचेही गडकरींनी नमूद केले. निकाल काहीही असला तरी तो खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवा, असाही सल्ला त्यांनी दिला. शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण होण्यासाठी सामनाच जबाबदार आहे. त्यामुळे मैत्री ठेवायची असेल तर जबाबदारीने लिहावे लागेल. पंतप्रधान, आणि भाजप अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह लिहिणे टाळावे, असे गडकरी म्हणाले.