महापौर मॅरेथॉनसाठी सर्व वाहनांना प्रवेशबंदी आदेश

0

पालघर । 7 वी महापौर मॅरेथॉन स्पर्धा 2017 वसई-विरार शहर महानगरपालिका व वसई तालुका कलाक्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 डिसेंबर रोजी विरार व वसई येथे पार पडणार असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी पालघर यांनी मॅरेथॉन मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदीबाबत वाहतूक नियंत्रण करण्याच्या अधिसूचना पोलीस विभागास निर्गमित केल्या आहेत. ही स्पर्धा दोन गटांत होणार असून पहिल्या गटामध्ये 42 की. मी. ची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा नवीन विवा कॉलेज विरार येथून सुरू होऊन ती तिरुपतीनगर जकातनाका विरार (प.) बोळींज नाका, पाटील आळी, उमराळे चर्च, चक्रेश्‍वर तलाव, हेगडेवार चौक, समेळपाडा, नालासोपारा रेल्वे ओव्हरब्रीज, आचोळे रोड, बँक ऑॅफ इंडिया, वसंतनगरी मैदान, वसंत नगरी सर्कल, वसई स्टेशन रोड, वसई रेल्वे ओव्हरब्रीज, पंचवटी नाका, आंबाडी रोड, माणिकपूर नाका, वसई-माणिकपूर रोड, बाभोळा नाका, पापडी नाका, तामतलाव नाका, वसईगाव बसडेपो, जी. जी. कॉलेज विरार येथे संपुष्टात येईल.

दोन गटांत पार पडणार स्पर्धा
दुसर्‍या गटामध्ये 21 कि. मी. अर्ध मॅरेथॉन स्पर्धा होणार असून, वसई पंचायत समिती नाका येथून सुरू होऊन वसई बस डेपो, तामतलाव नाका, पापडी नाका, वसई स्टेशन रोड, बाभोळा नाका, वसई-माणिकपूर रोड, माणिकपूर नाका, नवघर अंबाडी रोड पोलीस चौकी, अंबाडी रोड पंचवटी नाका, वसई रेल्वे ओव्हरब्रिज, वसंतनगरी मेन रोड, वसंत नगरी मैदान, आचोळे फायरब्रिगेड स्टेशन, बँक ऑफ इंडिया, आचोळे रोड (पुर्व) नालासोपारा रेल्वे ओव्हर ब्रीज, समेळपाडा, हेगडेवार चौक, चक्रेश्वर तलाव सोपारा, उमराळे चर्च, पाटील आळी, बोळीजनाका, तिरुपतीनगर या मार्गाने येऊन तीही नवीन विवा कॉलेज विरार येथे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचनाही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने, मॅरेथॉन स्पर्धेतील वाहनांना लागू राहणार नाहीत, असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा दंडाधिकारी पालघर यांनी कळवले आहे.