जळगाव । महानगर पालिकेचे नवनियुक्त महापौर ललित कोल्हे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी शहराच्या विकासासाठी विविध विषयावर चर्चा केली. मंत्री महाजन हे रविवारी तापी पाटबंधारे विकास महामंडळ विश्राम गृहात आले होते. त्याप्रसंगी महापौरांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार चंदु पटेल, माजी उपमहापौर सुनिल महाजन, उपस्थित होते. शहरातील प्रत्येक वार्डात हायमास्ट लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी महाजन यांच्याकडे करण्यात आली. महाजन यांनी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.