जळगाव: नवनिर्वाचित महापौर सौ. सिमाताई भोळे यांना पदभार स्विकारले नंतर जळगांव शहर महानगरपालिका हद्दीतील नागरीकांच्या पाणी पुरवठा, बांधकाम, आरोग्य, विद्युत विभागा संबंधी असलेल्या विविध समस्या जाणुन घेणे तसेच त्यांचे निरसन करणे तसेच शहरासह वाढीव भागात किमान मुलभूत सुविधा पुरविणे कामी शहर अभियंता, प्रभाग अधिकारी क्र. 1 ते 4, पाणी पुरवठा अभियंता, आरोग्याधिकारी यांचेसह आढावा बैठक घेतली.
सदर बैठकी दरम्यान शहरात सद्यस्थित प्रामुख्याने सर्वसामान्यांना भेडसावत असलेला मोकाट कुत्र्यांच्या त्रास यावर उपाययोजना करणे कामी अहमदनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर मोकाट कुत्र्यांचे र्निबिजीकरण करणे, डॉग व्हॅन संबंधी अभ्यास करुन धोरणात्मक निर्णया नुसार कार्यवाही करणे, मनपा कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वीत करणे कामी सिव्हील वक्र्ससह विविध कामे हाती घेणे तसेच शहरात किमान 3 ठिकाणी कचरा संकलन डेपो बाबत चर्चा करण्यात आली, मनपा हद्दीतील वाढीव भाग ज्यांचा अमृत योजनेत समावेश नाहीत अश्या भागांचा सदर योजनेत समावेश करणे, शहरात अद्यावत साफसफाई राखणे तसेच खुले भुखंड स्वच्छ करणे कामी 4 जेसीबी भाडे तत्त्वावर घेणे बाबत धोरणात्मक निर्णय घेणे संबंधात, बांधकाम विभागा अंतर्गत अंत्यावश्यक मुलभूत सोई संबंधी कामांची याद्या तयार करणे, प्रभाग निहाय सव्र्हे करुन बंदावस्थेत असलेले पथदिवे कार्यान्वीत करणे तसेच प्रभाग अधिकारी यांनी नगरसेवकांना भेटून नगरसेवक डायरीमध्ये प्रभागातील सुधारणा, तक्रारी व त्यांचे निरसना बाबत सविस्तर नोंद घेवुन त्यांसंबंधी प्रत्येक शुक्रवारी संबंधीत प्रभाग नगरसेवक, चारही प्रभाग अधिकारी, संबंधित अभियंते यांचेसह बैठकाचे आयोजन करुन समस्यांचे निराकरण करणे बाबत चर्चा करण्यात आली.
सदर प्रसंगी महापौर सिमाताई भोळे यांच्यासह जळगांव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) तसेच उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, भाजपा गटनेते भगत बालाणी, भाजपा उपगटनेते राजेंद्र पाटील, सन्मा.सदस्य डॉ. विश्वनाथ खडके, सुनिल खडके, जितेंद्र मराठे, धिरज सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विशाल त्रिपाठी, अतुल हाडा, गजानन देशमुख, उत्तम शिंदे, मनोज काळे आदी मान्यवर उपस्थित होते.