जळगाव: शहराच्या भाजपच्या महापौर सीमा भोळे यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. भाजपने त्यांना पहिल्या टर्मची संधी दिली होती. ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याने नवीन महापौरपदाची लवकरच निवड होईल. नवीन महापौर पदासाठी कैलास सोनवणे यांचं पत्नी भारती सोनवणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.