महामंडलेश्‍वर शांतीगिरीजी महाराजांना धमकीचा निषेध : दोषींवर कारवाईची मागणी

0

यावलल प्रांताधिकारी प्रशासनाला भक्त परीवाराने दिले निवेदन

यावल- श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना जीवे ठार मारण्याची धमकी पत्रान्वये देण्यात आली असून पत्र पाठवणार्‍या समाजकटंकाची कसून चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुका जय बाबाजी भक्त परीवाराच्या वतीने बुधवारी फैजपूर प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात आला आहे

संतांना धमकावणे निंदणीय बाब
श्री क्षेत्र वेरूळ, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद येथील निष्काम कर्मयोगी जगदगुरू संत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपिठाचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना गेल्या शुक्रवारी पोष्टाद्वारारे जीवे ठार मारण्यासंदर्भात पत्र आले असून त्या पत्रावर पाठवणार्‍याचे नाव निती गणेश मोरे, नाशिक असे आहे. तेव्हा अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व व्यसनमुक्ती करीता भरीव कार्य करणार्‍या संतांना अशा प्रकारे धमकवणे अत्यंत निंदणीय आह. धमकी देणार्‍या समाजकंटकाची सखोल चौकशी व्हावी व या मागे कोण आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच महाराजांना सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी या निदेवनाद्वारे करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
बुधवारी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयासह व उपविभागीय पोलिस कार्यालयात किशोर कुळकर्णी, अजय गडे, मुकुंदा भार्गव, एकनाथ कोळी, प्रकाश गजमुखी, श्रीकांत पाचपांडे, कमलाकर पाटील, प्रभाकर पाईल, सुरेश चौधरी, बबन कासार, रवींद्र पाटील यांच्यासह भक्तांनी निवेदन दिले.