महामंडळाच्या कर्ज व अनुदानाची मर्यादा वाढवून द्या

0

शिरपूर । धुळे सर्कीट हाऊस येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनप्रसंगी आलेले राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना भाजपा अनु. जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा लाभ एकही लाभार्थीला मिळाला नसून ही योजना लाभार्थ्यांना मिळण्यासंदर्भात अधिकार्यांना योग्य त्या सूचना करण्याची मागणी केली आहे.

अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालय, इंजिनिअरींग, मेडिकल, उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळण्यास संबंधितांना सूचना कराव्यात. त्याखेरीज महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाकडून मिळणारे कर्ज व अनुदानात मर्यादा वाढवून मिळावी जेणे करुन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. हे निवेदन देताना भाजपा अनु. जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, जिल्हासरचिटणीस डॉ. सुनील पानपाटील, प्रा. महेंद्र भामरे, प्रा. महेंद्र नगराळे, रत्नाकर बैसाणे, गौतम इंदाइस, संजय अहिरे, राजधर अमृतसागर, विजय पवार, हिरालाल डंगोरे उपस्थित होते.