महामानवाची जयंती शांततेत साजरा करा

0

सोनगीर। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असून हा जयंतीउत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर काल पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना एपीआय वारे बोलत होते.

विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी सोनगीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सी.एम.चातुरे यांच्यासह शांतता समितीचे अतुल शिरसाठ, भगवान बाविस्कर, पां.पा.नंदाणी,विशाल मोेरे, धर्मा मोरे, भटू मोरे, यशवंत धिवरे, प्रमोद धनगर, एल.बी.चौधरी, सतिष भावसार, पी.के.शिरसाठ, जितेंद्र बागूल आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना एपीआय वारे म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब यांनी आपल्याला समतेची शिकवण दिली. सर्वधर्म समभाव जपणार्‍या दलित बांधवांनी व आम जनतेने हा जयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा.