रावेर येथे बौध्द समाजाचा ऐतिहासिक निर्णय
रावेर :- तक्षशीला बुध्द विहारात बौध्द समाजाची बैठक झाली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त 2018 ची जयंती उत्सव समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली.
या बैठकीत बौध्द समाज बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सामाजिक कार्यक्रमांना यापुढे फक्त बौध्द समाजातूनच वर्गणी (धम्मदान) घेवून साजरी करावी आणि इतर समाज बांधवांकडून वर्गणी न घेता केवळ बौध्द समाज बांधवांकडूनच धम्मदान घेवून स्वाभिमानी जयंती साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.