सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल; डीजे चालकांची बैठक
भुसावळ– घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती असून या मिरवणुकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावीत, असे आवाहन असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात डीजे चालकांच्या बैठकीत केले. ध्वनी प्रदूषण केल्यास पोलीस कारवाई करतील, असा इशारादेखील त्यांनी केला.
शहरातील बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीजे व्यावसायीकांची बैठक सोमवारी सायंकाळी सात वाजता झाली. बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी प्रास्ताविक केले. दहा ते 12 दिवस अगोदर व्यावसायीकांची बैठक घेऊन सूचना दिल्या जात आहे, कोणते मंडळ जर आपणावर दबाव आणत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी मात्र कोणीही डीजे वाद्य वाजवून अन्य नागरिकांना त्रास होईल असे करू नये, असे आवाहन सरोदे यांनी केले.
** आनंद मिळेल असेच वाद्य लावा
मोठ्या आवाजाची वाद्य वाजविल्याने अन्य लोकांना त्रास होतो त्यामुळे पारंपरिक वाद्यांनाच पसंती द्यावी, असे आवाहन सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांनी केले. मंडळाच्या पदाधिकार्यांनी अॅाक्टोपॅड म्युझिकल वाद्य वाजवल्यास त्यास पोलिसांचा विरोध राहणार नाही. सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी आभार मानले.