फैजपुर येथे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे
फैजपुर- देश वाचवण्याची सुरुवात फैजपुर नगरीतील पावन भूमी पासून आज ₹पासून होत आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वापरून मतदान मागण्याचा भाजपाला नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन लोसाभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी येथे केले. ते म्हणाले की, भाजपा व आरएसएसने देशासाठी कोणते बलिदान दिले आहे मात्र काँग्रेस व अनेक दिग्गज नेत्यांनी बलिदान दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
काँग्रेसने तर 72 हजार शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. भाजपा सरकारच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले यावर आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काहीही बोलायला तयार नाहीत. 500 किलोमिटर मेट्रो ट्रेन साठी मोदी सरकारने एक लाख करोड रुपयांचे कर्ज जपानकडून घेतले आहे मात्र गेल्या चार वर्षात एकाही बेरोजगार युवकांना काम न मिळाल्याने जनता त्रस्त झाली आहे. आगामी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार निश्चित सत्तेवर येईल, असा दावाही खरगे यांनी केला. फैजपूरच्या ऐतिहासिक पावन भूमीत दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे , अशोक कुमार चव्हाण, हर्षवर्धन पाटील नसीम खान, भाई जगताप, विनायकराव सोनवणे आदी उवस्थित होते.