भुसावळ विभागात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात ; प्रबोधनपर देखाव्यांनी वेधले शहरवासीयांचे लक्ष ; पारंपरीक वाद्याच्या तालावर थिरकली तरुणाई ; दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भुसावळ- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर व विभागात विविध रविवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळ शहरातील जुन्या पालिका कार्यालयासमोरील महामानवाच्या पुतळ्यासमोर मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास पुतळ्यास अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. रविवारी दिवसभर महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो उपासक-उपासिका यांच्यासह नागरीक व लोकप्रतिनिधींची गर्दी झाली होती. सायंकाळी शहर व बाजारपेठ हद्दीतील 29 मंडळांतर्फे अत्यंत शिस्तबद्ध पद्धत्तीने मिरवणुका काढण्यात आल्या तर त्यातील समाजप्रबोधनपर देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले.
वंचित बहुजन कंत्राटदार संघटना
दीपनगर- विद्युत केंद्रातील वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठाण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करून अभिवादन केले. उपाध्यक्ष मन्साराम कोळी, शाखाध्यक्ष नारायण झटके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक प्रकाश तायडे, दिनकर सुर्यवंशी, प्रेमसिंग ठाकूर, रवी सरदार आदी उपस्थित होते.
फुलगावला महामानवास अभिवादन
फुलगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी अभिवादन केले. तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, तालुका उपाध्यक्ष विलास महाजन, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत पाटील, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, अतुल झांबरे, स्वप्नील पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, सरपंच वैशाली टाकोळे, उपसरपंच राजकुमार चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, ग्रामपंचायत सदस्य नारायण झांबरे, हेमलता शिंदे, गायत्री चौधरी, प्रणिता चौधरी, मंगला चौधरी, शाखाध्यक्ष दिलीप पाटील, बुथप्रमुख सागर पाटील, बुथप्रमुख गणेश चौधरी, बुथप्रमुख हरी टाकोळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमित बर्हाटे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनावणे, कौस्तुभ पाटील, वैभव महाजन आदी उपस्थित होते.
फैजपूरला दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
फैजपूर- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंतीनिमित्त शहरातील मोटारसायकल रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक दतात्रय निकम, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, हेमराज चौधरी, इरफान शेख, प्रभाकर सपकाळे, रईस मोमीन, डॉ. इम्रान शेख, देवेंद्र बेंडाळे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी उपनगराध्यक्ष जी.पी.पाटील आदींची उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष राजनंदन मेढे, उपाध्यक्ष सागर भालेराव, सचिव योगीराज मेढे, खजिनदार चेतन मेढे, कार्याध्यक्ष विनोद तायडे, सल्लागार अंकुश इंगळे, सहसचिव राजू वाघ, सिद्धार्थ मेढे, राजन मेढे, बौद्ध पंच त्रस्त अध्यक्ष भीमराव मेढे, संतोष मेढे, विजय मेढे, भारिप शहराध्यक्ष अमर मेढे, पप्पू मेढे, अजय मेढे, भूषण मेढे, मुन्ना मेढे, मयूर मेढे आदींनी सहकार्य केले.
वरणगावात महामानवास खासदारांनी केले अभिवादन
वरणगाव- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा निखील खडसे यांनी अभिवांदन केले. प्रसंगी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील, कृउबा समिती संचालक प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, नगरसेविका जागृती बढे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील, अतुल झांबरे, गुड्डू बढे, हाजी मका सेठ, स्वप्नील पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस महेश सोनावणे, कौस्तुभ महाजन, वैभव महाजन, लल्ला माळी, रमेश इंगळे आदी उपस्थित होते.
शिवसेनेतर्फे महामानवास अभिवादन
भुसावळ- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, बाळासाहेब भोई, युवासेना तालुका प्रमुख हेमंत बर्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, राकेश खरारे, उपशहर संघटक सोनी ठाकूर, विभाग प्रमुख विकास खडके, युवासेना चिटणीस मयूर जाधव, कुमार भारंबे, जयेश भंगाळे उपस्थित होते.
रावेर वनपरीक्षेत्र कार्यालयातही अभिवादन
रावेर- महामानवाला जयंतीनिमित्त रावेर वनपरीक्षेत्र कार्यालयात अभिवादन करण्यात आले. वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. राणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्या विषयी माहिती दिली. वनपाल अरविंद धोबी, संजय भदाणे, आगार रक्षक यशवंत पाटील, वनरक्षक प्रकाश सलगर, हरीष थोरात, सुपडू सपकाळे, गजानन आढवणे, सोपान बदगणे, नीलम परदेशी, कल्पना पाटील, कार्यालयीन कर्मचारी अरुण भंगाळे, मेहरबान तडवी, संगणक परीचालक गौरव अस्वार आदी उपस्थित होते.