वरखेडी । येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला शेतकरीसंघ पाचोरा संचालक व माजी सरपंच डिगंबर पाटील, ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, धनराज विसपुत यांनी पुष्पहार अर्पण केल व समुहायिक प्रर्थना करण्यात आली. यावेळी भोकरी गावाचे ग्रा.पं. सदस्य डॉ.रशीद शब्बीर काकर, डॉ.धनराज पाटील, विजय भोई, राकेश पाटील, जे.बी.पाटील, फकीरा गांगो, बाळू कुमावत, पो.पा.वरखेडी बुद्रुक, दगडू गोसावी, पो.पा.वरखेडी खु दिपकबागुल, ग्रा.प.सदस्य वरखेडी गजानन पाटील, सुकलाल गांगो, कचरू मोची, राबा धनगर, सुभाष धनगर, पत्रकार रविशंकर पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काशिनाथ सुरवाडे, लक्ष्मण सोनवणे, शिवाजी बागुल, मनोज गायकवाड, नितीन सोनवणे, एकनाथ सुरवाडे, पिराजी सुरवाडे, संजय बागुल, अप्पा गायकवाड, सुदाम सपकाळे, प्रताप सपकाळे, मधुकर सुरवाडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व समाज बांधवानी पुष्पहार अर्पण करूण अभिवादन केले.
वरखेडी खुर्द अंगणवाडीत माल्यार्पण
वरखेडी । येथून जवळच असलेल्या वरखेडी खुर्द येथील आंगणवाडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार रविशंकर पांडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मला आर्पण करण्यात आले. यावेळी दगडू गोसावी, पोलीस पाटील वरखेडी खुर्द फकीरा बुधा गांगो, संचलकवी.का.सो.सुकलालगांगो कचरू मोची शक्ती पाटील, प्रताप सपकाळे, आंगणवाडीत सेविका प्रमिलाबाई सपकाळे, विमलबाई बाविस्कर यांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले वाचनालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सपोनि मोहन बोरसे हे होते. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पाळधीचे सरपंच कमलाकर पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष विवेक जाधव, किरण खैरनार, भालेराव सर, दिनकर सुरडकर, बाविस्कर सर, नरेंद्र खैरनार, अहिरेदादा, दिपक जाधव आदी मान्यवरांचे हस्ते मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार विवेक जाधव यांनी मानले.
पहूर शहरातून मिरवणूक
पहूर । पहूर पेठ येथील आंबेडकर नगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सजावलेल्या ट्रक्टरमधून पहूर पेठ, पहुर कसबे येथे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीची सांगता बुद्ध विहार जामनेर रोड येथे झाली. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबडेकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सरपंच प्रदिप लोढा, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, किरण खैरनार, नरेंद्र खैरनार, रवी मोरे, समाधान मोरे, रतन नरवाडे, लहान दभाडे, सुरेश मोरे, शरद नरवाडे, नरेश मोरे कपिल खैरनार आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.