महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

0

मुक्ताईनगर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संस्था- संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन तसेच मोटारसायकल रॅली, अन्नदान यांसह विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येऊन महामानवास अभिवादन करण्यात येऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

ज्ञानपूर्ण विद्यालय, इच्छापूर
तालुक्यातील ज्ञानपूणार्र् विद्यालय इच्छापूर निमखेडी बु. येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य एन.आय. पाटील, पर्यवेक्षक सी.बी. मोरस्कर, माजी प्राचार्य आर.एस. कांडेलकर, बी.आर. मुळक, एम.बी. पाटील, आशा कांडेलकर, प्रा.एस.आर. राणे, प्रा. विद्या मंडपे, बी.के. महाजन, महेंद्र तायडे, सुधीर मेंढे, विनायक वाडेकर, व्ही.आर. भावराय, मनोज भोई, गणेश पवार, पी.एम. पाटील, विश्वासराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, गोपाळ सपकाळे, मंजुराबाई पाटील, बेबाबाई धाडे आदी उपस्थित होते.

राधा गोविंद विद्यालय कर्की
मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालयात बाबासाहेंबाना अभिवादन करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापक बी.एस. वानखेडे, पर्यवेक्षक आर.सी. पाटील, संजय वाडीले, एस.के. तायडे, के.आर. पाटील, एस.एम. महाजन, पी.डी. महाजन, एस.आर. खर्डे, एच.एस. पाटील, राहुल बैदे, प्रवीण भोई आदी उपस्थित होते.

अंतुर्ली येथे ज्ञानोदय वाचनालयात ग्रंथप्रदर्शन
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील ज्ञानोदय वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले, तसेच सेवानिवृतांचा सत्कार देखील करण्यात आला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए. भोई होते तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी समीर शेख यांचे हस्ते झाले. व्यासपीठावर माजी सरपंच शरद महाजन, लीला पवार, संचालक अनिल वाडीले, रवींद्र महाजन, भाऊराव महाजन, दिनेश पाटील, प्राचार्य एन.आय. पाटील, मुख्याध्यापक बी.एस. वानखेडे, पोलीस पाटील किशोर मेढे, काशिनाथ शिरतुरे उपस्थित होते. प्रसंगी बीएसएफ मधील सेवानिवृत्त जवान रामू मेढे व शिक्षक बी.एन. कोळी यांचा सेवापूर्ती गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रुष्टी कोसोदे, प्रवर्तन कोसोदे,व साक्षी कोसोदे यांनी भाषण सादर केले. प्रास्ताविक सेनू भोई यांनी केले. सूत्रसंचालन बी.डी. बारी यांनी स्वागतगीत प्रा.विद्या मंडपे यांनी तर आभार अनिल वाडीले यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रंथपाल मधुकर न्हावकर, शांताराम महाजन, नितीन वाडीले, लहू वाडीले, गणेश न्हावकर यांनी परिश्रम घेतले.

संताजी सार्वजनिक वाचनालय, चुंचाळे
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील संत संताजी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात जयंती साजरी करण्यात आली. खान्देश युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष भरत चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी युवराजसिंग पाटील, नागराज महाजन, प्रदिप वानखेडे, अमृत पाटील, देवचंद कोळी उपस्थित होते.

होमगार्ड कार्यालय
मुक्ताईनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होमगार्ड कार्यालयात प्रतिमा पुजन करण्यात आली तेव्हा समादेशक अधिकारी निळे, पलटननायक विकास जुमळे व विजय बोराखेडे व होमगार्ड दिलीप टोंगे, राजु घुले, बाळू मेढे, संजय रायपुरे, कन्हैया बोदडे, सुनील तायडे, संजय खैरनार, देवेंद्र काटे आदी उपस्थित होते.

जी.जी. खडसे महाविद्यालय
येथे कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.आर. पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख वक्त्या प्रा. सी.व्ही. ठिंगळे यांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. एन.जी. सरोदे, उपप्राचार्य एन.ए.पाटील, एस.एम.पाटील उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.डी.एन.बावस्कर यांनी केले.

बोदवड शहर
शहरात डॉ. बाबासाहेब आंंबेडकर जयंतीनिमित्त तक्षशिला बुध्द विहारात प्रतिमाचा पूजनाचा कार्यक्रम झाला. नगराध्यक्षा मुमताज बी सईद बागवान यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नितीन चव्हाण, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, रामदास पाटील, मधु राणे, कैलास चौधरी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनगर, भरत पाटील, सागर पाटील, इरफान बागवान, गोपाळ अग्रवाल, के.एस. सुरवाडे, भागवत टिकारे उपस्थित होते. जयंती समिती अध्यक्ष गोविंदा तायडे, विनोद तायडे, जगन गुरचळ, श्रावण बोदडे, ईश्‍वर इंगळे, समाधान गुरचळ उपस्थित होते.