महामार्गच्या सहाय्यक निरीक्षकासह पोलिस नाईक जाळ्यात
आठ हजारांची लाच घेताना नाशिक एसीबीची कारवाई : ओझर पोलिसात गुन्हा
ट्रान्सपोर्ट व्यावसायीकाची तक्रार
नाशिकच्या 37 वर्षी तक्रारदारांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. कोकंणगाव, पिंपळगाव येथील महामार्ग सुरक्षा पथकातील सहाय्यक निरीक्षकासह पोलिस नाईकाने आठ हजारांची लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर 15 मार्च रोजी लाचेची पडताळणी करण्यात आली व शुक्रवार, 19 रोजी सायंकाळी लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार, हवालदार सुकदेव मुरकुटे, नाईक मनोज पाटील, हवालदार डोंगरे, नाईक इंगळे, चालक जाधव आदींनी यशस्वी केला.