जळगाव: जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गामुळे अनेक निरपराध प्रवाशींचा बळी गेला आहे. मात्र प्रशासनाला याचे कोणतेही सोयर-सुतक नाही. महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाबाबत अनेक निवेदने देण्यात आली, आंदोलने झाली. मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सुस्त आहे. काहीही कारवाई न झाल्याने नशिराबाद येथील नागरिकांनी महामार्ग प्राधीकरण अर्थात ‘नही’ चे प्रतिकात्मक दशक्रिया विरीधी करून निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यात सामुहिक मुंडनही करण्यात आले तसेच उत्तरकार्याचे १०० लोकांना जेवण घातले. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबादचे सरपंच विकास पाटील, गजानन मालपुरे, योगेश देसले, विनोद तराळ आदी उपस्थित होते.
दोन तीन दिवसात ‘नही’ने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.