महामार्गाचे काम संथगतीने

0

वाघोली : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून पुणे-नगर राष्ट्रीय महामार्ग रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे व अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे संबधित ठेकेदाराने हे काम तात्काळ काम मार्गी लावावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे उपसरपंच कविता दळवी यांनी पीएमआरडीएकडे केली आहे.

पुणे – नगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तीन महिन्यांपासून सुरू आहे. रस्त्यामध्ये असणारे विद्युत खांब अद्यापही काढण्यात आले नसल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाहतूककोंडीपासून सुटका मिळावी या उद्देशाने रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र संथ गतीने चालणार्‍या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्डे बुजवून तत्काळ संबधित ठेकेदारांनी काम मार्गी लावावे अशी मागणी कविता दळवी यांनी केली आहे.