वरणगाव- महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात बोहर्डी ते भुसावळदरम्यानचे दहा ते बारा बस थांबा निवारे तोडले जात असल्याने आमदार निधीतून झालेला लाखोंचा खर्च पाण्यात गेला आहे. पाच ते सहा वर्षापूर्वी हे निवारे प्रवाशांच्या सोयीसाठी हे निवारे उभारण्यात आले. ऊन, वारा व पावसात प्रवाशांना त्रास न होण्यासाठी व बसण्यासाठी आमदार निधीतून हे निवारे उभारण्यात आले होते. बस निवारे पाडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामार्गाचे काम सुरू होण्याआधी चार वर्षापासून रस्त्यावरील झाडेही तोडून टाकल्याने पर्यावरणाचा र्हास झाला असून प्रवाशांना थांबण्यासाठी सध्या जागा नसल्याने त्यांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ब्रिटीशकालीन पुलसुध्दा जमीनदोस्त होणार आहे.