महामार्गालगत हॉटेल चाहेलमध्ये 44 हजारांची देशी-विदेशी दारु जप्त

0

भुसावळ। येथील आशियायी महामार्गावरील हॉटेल चाहेलमध्ये शुक्रवार 12 रोजी मध्यरात्री सहाय्यक अधिकक्ष निलोत्पल यांच्या पथकाने कारवाई करुन 44 हजार 947 रुपयांची देशी विदेशी दारुसह दोघांना ताब्यात घेतले असून हॉटेल मालक पसार झाला. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या माहितीनुसार, 12 रोजी मध्यरात्री 11.30 ते 12 वाजेदरम्यान महामार्गावरील हॉटेल चाहेलवर कारवाई करुन हॉटेलच्या जवळून पोलिसांनी 44 हजार 947 रुपयांचे देशी विदेशी मद्य जप्त केले असून आरोपी अशपाक हिरा गवळी व अजहर रफीक गवळी यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, कॉन्स्टेबल प्रदीप पाटील, चालक सुनील शिंदे, पो.कॉ. सुनील थोरात, माणिक सपकाळे, निशीकांत जोशी, किशोर मोरे यांच्या सह सहकार्यांनी केली. याबबात बाजारपेठ पोलिसात पोलिस कॉन्स्टेबल सुनील थोरात यांच्या फिर्यादीवरुन अशपाक रफीक गवळी, अजहर हिरा गवळी व हॉटेल मालक विक्की चाहेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलचा मालक पसार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.