शिवसेना पदाधिकार्यांसह अतिक्रमण धारकांचे प्रशासनास निवेदन
यावल- शहरातून जाणार्या बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील अतिक्रमण पावसाळ्यानंतर हटवावे, अशी मागणी शिवसेना व अतिक्रमण धारकांनी गुरुवारी प्रभारी नायब तहसीलदार आर.बी.माळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चिरमाडे यांना निवेदनाद्वारे केली. पावसाळा सुरू असल्याने व्यावसायीकांचे साहित्य, दुकान, टपरी, शेड पर्यायी जागेत हलवणे शक्य होणार नाही तसेच भर पावसाळ्यात अतिक्रमण हटवल्यास व्यवसायिकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्हाड कोसळून त्यांचे हाल होणार असल्याने अतिक्रमण हटाव मोहिम पावसाळ्यानंतर राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, युवा सेना तालुका अधिकारी गोटू सोनवणे, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धोबी, शिवसेना शहर उपप्रमुख किरण बारी , शिवसेना शहर उपप्रमुख मोहसीन खान, शिवसेना शहर संघटक सुनील बारी, शिवसेना विभागप्रमुख पप्पू जोशी, युवा सेना उपाशहर अधिकारी सागर बोरसे, शकील पटेल, हरून खान, पिंटू कुंभार, महिंद्र कोळी, हमीद पटेल, मोहम्मद शफी, मोहम्मद तेहफुर तसेच अतिक्रमणधारक कय्युम पटेल, राहुल सोनवणे, सुरेश बारी, नीळकंठ बारी, रुपेश बारी, प्रकाश भोई, अर्जुन बारी, योगेश सपकाळे, प्रभाकर बारी, संजय नेवे, सुरेश बारी, अजय नेवे, अजय पारधे, हेमराज पाटील, गंगाधर पारधे, चंद्रकांत नाईक, विलास कोळी, सुरेश भाई, शुभम सोनवणे, विनोद बारी, किरण माळी, तुकाराम माळी, किशोर नारेकर, अशोक येवले यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक व्यापारी व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षर्या आहेत.