महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

0

मुक्ताईनगर । महाराष्ट्र व मध्यप्रदेशला जोडणारा राज्य महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने खड्डे चुकवण्याच्या बेतात चारचाकी वाहनधारकांची व दुचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यालगत साईडपट्टयांचा अभाव
मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूरला जोडणारा राज्य महामार्ग गेल्या दोन महिन्यांपासून छोट्या-छोट्या भागांमध्ये दुरुस्त करण्यात आला होता. महाराष्ट्र व मध्यप्रदेशला हा रस्ता जोडला असून नेहमी या रस्त्यावरुन वर्दळ चालूच असते तसेच या रस्त्यावर मध्यप्रदेश शासनाचे आरटीओ व महाराष्ट्र शासनाचे आरटीओचे नाके आहेत. या रस्त्यावरुन ओव्हरलोड गाड्यांची तपासणी या नाक्यांवर होत असते. परंतु काही ओव्हरलोडचे ट्रक टोलनाका चुकवण्यासाठी नायगाव फाट्यामार्गे मध्यप्रदेशकडे जातात व शासनाचा कर चुकवतात. यामुळे रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असल्याने दरवर्षी या रस्त्याचे ठेके दिले जातात व रस्ता दुरुस्त केला जातो. परंतु दुरुस्त करुनही या रस्त्याची दुर्दशा काही महिन्यातच पाहायला मिळते.

या रस्त्याला साईड पट्ट्यांचा अभाव असल्याने व रस्त्याला
मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे चुकवण्याच्या बेतात समोरील येणार्‍या वाहनधारकांनाही कसरत करावी लागत आहे. यामुळे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात नेहमीच पाहायला मिळतात. शासनाने याकडे त्वरीत लक्ष घालून रस्त्याची दुर्दशा थांबवावी व वाहनधारकांना होरा नाहक त्रास थांवावा, अशी परिसरातून मागणी होत आहे.