नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यातील महामार्गावर 500 मीटरपर्यंत दारुच्या दुकानांवर बंदी घातल्याच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासाठी राज्यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
पंजाब, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांसह अन्य राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आपल्या आदेशावर पुनर्विचार करावा, यासाठी याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 500 मीटरपर्यंत दाच्या दुकानांवर बंदी घालण्यात येणार आहे. या महामार्गावरील सर्व दुकानांचे परवाने 31 मार्च रोजी संपुष्टात येतील. महामार्गावरील दार- संबंध3च्या जाहिराती आणि फलक हटवण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक या आदेशाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याचे काम करतील, असे आदेश न्यायालयाने दिले. दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे दीड लाख पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो, ही बाब दुर्दैवी असल्याचे मत न्यायालयाने यावेळी नोंदवले होते आणि यामुळेच महामार्गावरील दारूच्या दुकानांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.