हडपसर । परिसरातील पाच-सहा सोसायट्यांनी सोलापूर महामार्गाच्या पावसाळी गटार वाहिनीत ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. त्यामधील कचर्याने वाहिनी तुंबल्याने त्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून थेट रस्त्यात कचराकुंड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सोसायट्यांच्या आत ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करावी, कचराकुंड्या रस्त्यातून हटवाव्यात, याबाबत ग्रामपंचायतला पत्र दिले आहे.मांजरी येथे पुणे-सोलापूर महामार्गावर गेली काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. तसेच याच मार्गावर ग्रामपंचायतीने भर रस्त्यावर कचराकुंड्या मांडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
डास, माशा व दुर्गंधीचा त्रास
महामार्गावर मांजरी स्टडफार्म परिसरात शहरात येणार्या महामार्गालगत असलेले पावसाळी ड्रेनेज तुंबल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तसेच येथे चिखलही पसरला आहे. जवळच ग्रामपंचायतने भर महामार्गावर कचराकुंड्या मांडल्या आहेत. हे पाणी व कुंड्या ओसंडून वाहत असल्याने रात्रीच्या वेळी चालकांच्या लक्षात येत नसल्याने दररोज येथे अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. दुचाकी घसरूनही छोटे-छोटे अपघात होत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे डास, माशा व दुर्गंधीचा त्रास स्थानिकांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, मांजरी ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.
ग्रामपंचायतीला पत्र
परिसरातील पाच-सहा सोसायट्यांनी माहमार्गाच्या पावसाळी गटार वाहिनीत ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. त्यामधील कचर्याने वाहिनी तुंबल्याने त्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे. तसेच ग्रांपंचायतकडून थेट रस्त्यात कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सोसायट्यांच्या ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था करावी, कचराकुंड्या रस्त्यातून हटवाव्यात, याबाबत ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे.
– अशोक गिरमे
शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
त्यांच्यावर कारवाई
ग्रामसेवकांना त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून कार्यवाही करण्यास सांगितले आहे. संबंधित सोसायट्यांनी महामार्गाच्या पावसाळी वाहिनीत ड्रेनेज सोडले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कचरा कुंड्या महामार्गातून हलविण्यासही सांगितले आहे.
– संजय जाधव
प्रशासक, मांजरी बु्द्रुक