पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वर अपघातांचे प्रमाण दिवसे दिवस वाढत असून हे अपघात महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळेच होत असल्याचा आरोप नागरिक करताहेत सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मुंबई अहमदाबाद महामार्गवरील हालोली गावाजवळ श्रीदत्त हॉटेल समोर बाईक स्वार अनधिकृत रित्या तयार केलेल्या कट मधून रस्ता क्रॉस करत असताना गुजरात कडून मुंबई कड़े जाणार्या कारने बाईकला जोरदार धड़क दिली.या धड़केमधे बाईकवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना सिलवासा मधील विनोबा भावे रुग्णालयात उपचारा करिता पाठविन्यात आले आहे