महामार्गावर आयशर,कंटेनरची समोरासमोर धडक

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी पुलावर आयशर-कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना पहाटे 5.10 मिनीटांनी घडली. या अपघातामुळे जवळपास तीन तास महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. घटनास्थळी तालुका पोलिस व महामार्गा पोलिसांनी धाव घेवून वाहतुक सुरळीत केली. या अपघातात आयशर चालकाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

तालुका पोलीस कर्मचार्‍यांची धाव
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बांभोरी पुलाजवळ सुरतहुन रायपुर येथे जाणारा कंटेनर (सीजी 04 सीडी 6062) ला जळगावकडून धुळयाकडे जाणार्‍या आयशर क्रमांक (एमएच 04 एफडी 1073) ने समोरुन जोरदार धडक दिली. या आयशर चालक गंभीर जखमी झाला. तर कंटेनर चालक शैलेश रॉय (रा. रायपूर, छत्तीसगड) याला किरकोळ दुखापत झाली. अपघात बांभोरी पुलावरच झाल्याने दोन्ही बाजुची वाहतुक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. घटनेची माहिती तालुका पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सपोनि सचिन बागुल, पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, पोकॉ. जितेंद्र पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून कंटेनरच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजुला केली. त्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे जवळपास महामार्गावरील वाहतूकीची कोंडी झाली होती.