महामार्गावर एकाचा खून

0
पिंपरी : पुणे-मुंबईवरील बावधन परीसरात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे. ही घटना बावधन उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नसून व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष आहे. अंगावर निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, चॉकलेटी रेघा असलेला पांढरा शर्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर बावधन येथे सर्व्हिस रस्त्यावर एक अनोळखी इसम मृतावस्थेत पडलेला आढळून आला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. खून झालेली व्यक्ती कामगार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.