जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याप्रकरणी कारवरील चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कार चालकाविरोधात अखेर गुन्हा
समीर सलीम मण्यार (21, रा.शिरपूर, ता.धुळे) हा तरुण कामाच्या निमित्ताने 25 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास नशिराबादकडून जळगावकडे दुचाकी (एम.एच.19 सी.ए.2617) ने येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवर समोर भुसावळकडे जाणार्या भरधाव कार क्रमांक (एम.एच. 12 एस.एल. 7242) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार समीर मन्यार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. सात दिवसांच्या उपचारानंतर शनिवार, 3 एप्रिल रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर चारचाकी (एम.एच.12 एस.एल. 7242) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.