जळगाव- महामार्गावर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात पाळधीकडे जात असलेली कार जळगाव शहराकडे येत असलेल्या दुधाच्या टँकरवर धडकल्याची सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. खोटे नगरच्या पुढे हॉटेल साई पॅलेसजवळ झालेल्या अपघातात कारमधील तिघे तरूण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, टँकर उलटल्याने यातील दूध घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली हेाती. दोनही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उशीरा पर्यंत क्रेन बोलवून टँकर बाजूला करण्याचे काम सुरू होते.