नवापूर । शहराजवळी हायवे क्र.6 वरील धु्रव पेट्रोल पंपाजवळ रविवारी 11 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार खड्डा वाचविण्याच्या नादात समोरून येणार्या भरधाव ट्रकची जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र ट्रक चालक अपघात होताच फरार झाला होता. जखमी मोटारसायकलस्वार याला पुढील उपचारासाठी सोनगड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक झाली ठप्प
जखमी झालेला व्यक्ती हा गुजरात राज्यातील उच्छल तालुका सॅसा गावातील रहिवासी असून त्याचे नाव जितू भरत गामीत (वय-34) आहे. अपघात होताच महामार्गावर एकच गर्दी झाली होती. महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन धावपळ उडाली होती. अपघातात मोटारसायकल स्वार रक्तबंबाळ होऊन दोघा पायांने गंभीर दुखापत होऊन जखमी झाला. अपघात होताच आजुबाजूला असलेले लोक धावुन आले तसेच घटनास्थळी ट्राफिक पोलीस कर्मचारी आले व त्यांनी मदत कार्य केले. 108ला कॉल केल्यावर तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या व्यक्तीला 108 रूग्वाहिकेत डॉ सुनिल गावीत, लाजरस गावीत यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रस्ता दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर
महामार्गवरील खड्डे व दुरावस्थाबाबत जनशक्तीने फोटो सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती तसेच सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी देखील निवेदन देऊन अर्धनग्नचा इशारा दिला होता. महामार्गावरील खड्डे व होणारे रोजचे अपघात याबाबत जनशक्ती कडे अनेक वाहनचालकांनी तक्रारी केल्यानंतर जनशक्तीचा वृताची दखल महामार्गाचा रस्ता दुरुस्तीचे युध्द पातळीवर आरटीओ चेक पोस्टपासुन भागातून खड्डे बुजविण्यात आले.