महामार्गावर गोदावरी कृषि महाविद्यालयाजवळ ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातात तीन ठार

0

वाहकासह  आठ ते दहा जण प्रवासी जखमी
जळगाव-  भुसावळ-जळगाव महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होवून या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री गोदावरील कृषि महाविद्यालयाजवळ घडली. ट्रक चालक राजाराम गेनाराम चौधरी रा बावडी ता.चौटल जि.बाटनेर, राजस्थान, निर्भयसिंग प्रतापसिंग कंवर वय 39 रा पलासिया ता.जाडोन, जि.उदयपूर, राजस्थान या दोघांचा जागीच तर ट्रॅव्हल्स चालक शंकर पटेल रा. राजस्थान याचा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या भिषण अपघातात ट्रॅव्हल्समधील वाहकासह आठ ते दहा  प्रवासी जखमी झाले आहे.

घटनास्थळाहून मिळालेली माहिती, ट्रॅव्हल्स (क्र जी.जे. 19 एक्स 9596) ही यवतमाळ हून सुरतकडे जात होती तर ट्रक हा जळगावकडून भुसावळकडे जात होता. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागुल यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतले. व रुग्णवाहिकेतून मयत तसेच जखमींना रुग्णालयता हलविले. अपघात एवढा जोरदार होता की ट्रक व ट्रॅव्हल्सचा चक्काचूर आहे. सकाळी अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच असल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. या अपघातात ट्रॅव्हल्समधील विनोद राठोड रा.भांबोरा ता.घाटंजी, यवतमाळ, राधा विनोद राठोड वय 30, पूजा विनोद राठोड, नारायण विनायक तांबोळे वय 45, गजानन चावके रा.दिग्रस, यवतमाळ, संतोष अग्निहोत्री, दोघे रा.रा.दिग्रस, यवतमाळ, ट्रॅव्हल्समधील वाहक अतिष पवार आदी जखमी झाले असून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इतर जखमींना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची नावे मिळू शकलेली नाही.