साक्री। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गावरील हॉटेलमध्ये, ढाब्यांवर दारु विक्रीस मनाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र महामार्गावरील बहुसंख्य हॉटेलमध्ये दारुचा महापूर असल्याचे चित्र आहे. महामार्गावरील अशाच एका हॉटेलवर साक्री पोलिसांनी छापा टाकून हजारो रुपयांची विदेशी दारु रात्री जप्त केली आहे.
साक्री पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सुरत महामार्गावरील हॉटेल अनुपार्क येथे बेकायदेशीर रित्या दारु विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन मध्यरात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिषेक पाटील आणि त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती 17 हजार रुपये किंमतीची विदेशी दारु लागली. पोलिसांनी हा मद्यसाठा जप्त केला असून हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.