जळगाव । महामार्ग प्राधिकरण व महापालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त मोहिमेत मागील महिन्यात शहरातून गेलेल्या महामार्गावरील खोटे नगर स्टॉप ते खेडी गावापर्यंतचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईनंतर महामार्गाचे दोन्ही बाजूचे समांतर रस्ते मोकळे झाले होते. शहरातील समांतर रस्त्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) 27 व 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी शहरातून जाणार्या महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले होते.
या मोहिमेची सुरूवात खोटे नगर स्टॉपपासून करण्यात आली होती. तर बुधवारी खेडी शिवारातील गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजला मोहीम संपविण्यात आली होती. न्हाईच्या या कारवाईत अतिक्रमण विभागाने जेसीबी, टॅक्टर, मनुष्यबळ आदींची मदत केली होती. मात्र, 1 मार्च नंतर पुन्हा खोटे नगर ते खेडी पर्यंतच्या समांतर रस्त्यावंर पुन्हा अतिक्रमण झाले आहे. न्हाईने महानगर पालिकेला अतिक्रमण निर्मुलन नंतर या रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यास कळावावे असे पत्र दिले आहे. याला महानगर पालिकेने उत्तर दिले आहे. या उत्तरात महानगर पालिकेने न्हाईने अतिक्रमण काढण्यासाठी अधिकारी प्राधिकृत केल्यास मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.
Prev Post
Next Post