महामार्ग कर्मचार्‍याचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू

0

भुसावळ : महामार्ग चौपदरीकरण कामावरील वेल्डिंग सेक्शनमधील कर्मचार्‍याचा पाय निसटल्याने त्याचा साकेगावातील वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. लालबाबू पंडित (45, न्यू दिल्ली) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. पंडित हे नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा पाय सरकल्याने ते नदीपात्रात पडले पाईपात अडकल्याने त्यांना बाहेर पडता न आल्याने जीव गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नदीपात्रातील पाईपात अडकल्याने मृत्यू
वाघुर नदीपात्रातून रस्ता तयार करण्यात आला असून नदीतील पाण्याचा प्रवाह वाहण्यासाठी मोठ-मोठे सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत. पंडित हे सोमवारी पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांचा पाय निसटल्याने ते पाण्यात पडले मात्र पोहता येत नसल्याने व पाईपात जावून अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. जेसीबीच्या सहाय्याने पाईप बाहेर काढल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, मयत लालबाग बाबू यांच्या मुलीचा लग्न ठरल्याने ते तयारीला लागले होते मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. असे असलेतरी कामावरील सहकार्‍यांनी त्यांच्या मुलीच्या गग्न कार्याची जवाबदारी स्वीकारली असून सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मदत करणार असल्याचे महामार्ग कामावरचे अधिकारी देवेंद्र महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, ही दुर्दैवी घटना साकेगावातील वाघूर नदीपात्रात घडली असलीतरी घटनास्थळ नशिराबाद हद्दीत असल्यामुळे या घटनेची नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.