महामार्ग मनपाकडे वर्ग न करण्याची शिवसेनेची मागणी

0

धुळे। सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार महामार्गावरील दारु दुकाने बंद करण्यात आल्यानंतर हे राष्ट्रीय महामार्ग मनपाकडे वर्ग करण्याचा सपाटा देशभरात सुरु असून धुळे शहरातूनही दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. या महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करण्यासाठी प्रस्ताव आल्यास तो स्विकारु नये, असे आवाहन करीत शिवसेनेने काल महापौर कल्पना महाले यांना निवेदन दिले.

1 एप्रिल पासून बंद पडलेल्या दारु दुकानांमुळे तळीरामांची तसेच दारुविक्रेत्यांची पंचाईत झाली असून हे महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग झाल्यास त्यांना नव्याने व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.दुकाने सुरु झाल्यास अनेकांचे संसार उध्वस्त होणार आहे, असे म्हटले आहे. यावेळी सतिष महाले, गंगाधर माळी, संजय गुजराथी, डॉ. माधुरी बोरसे, विश्‍वनाथ खरात, राजेंद्र पाटील, प्रशांत श्रीखंडे, अ‍ॅड.राजेंद्र गुजर, प्रमोद चौधरी, किरण जोंधळे, देवेंद्र भडागे, संतोष शर्मा, संजय जगताप, दिनेश पाटील, पंकज चौधरी, शेखर वाघ, संदीप चव्हाण, मुरलीधर जाधव, सुबोध पाटील, दिगंबर चौधरी, पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते