जळगाव : जळगाव जिल्ह्यातून जाणार्या महामार्ग चौपदरीकरणसह विविध मार्ग, उड्डाणपुलांचे लोकार्पण व नवीन कामांच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय रस्ते व परीवहन मंत्री नितीन गडकरी शुक्रवार, 22 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौर्यावर येत आहेत. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे व खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
कोट्यवधींची कामे पूर्ण
2015 मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जळगाव कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले त्यातून अनेक कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यात जिल्ह्यातून जाणारे चिखली ते तरसोद फाटा महामार्ग, शहरातून जाणारा महामार्ग, जळगाव ते भडगाव, जळगाव ते औरंगाबाद महामार्ग व उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश असल्याचे सांगितले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपचे सरचिटणीस मधुकर काटे, अरविंद देशमुख आदी पत्रकार परीषदेला उपस्थित होते.