महामेट्रोचे प्रकल्प अधिकारी दर शुक्रवारी साधणार संवाद

0

पिंपरी-चिंचवड : परिसरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मुख्य मार्गिका असून या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी महामेट्रोचे अधिकारी दर शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मेट्रो प्रकल्पाची योग्य माहिती आणि प्रगतीचे टप्पे पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत यासाठी वनाझ – रामवाडी मार्गाचे प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे आणि पिंपरी-चिंचवड – स्वारगेट मार्गिकेचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील म्हस्के हे त्या त्या मार्गिकेच्या कार्यालयात आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत उपलब्ध असणार आहेत.

संपर्कासाठी सहयोग केंद्र
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गिके संदर्भात अधिक माहितीसाठी महात्मा फुले म्युजीयम घोले रोड शिवाजीनगर पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम समोर पुणे, येथील कार्यालयात आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गिके संदर्भात अधिक माहितीसाठी वल्लभनगर, एसटी स्टॅण्डमागे सहयोग केंद्र येथे संपर्क साधण्याचे आवाहन, महामेट्रोने केले आहे.