महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांचा अर्ज दाखल

0

ना.महाजन यांची उपस्थिती , शहरात भाजपचे शक्तीप्रदर्शन

जळगाव- भाजप,शिवसेना,आरपीआय(आ),रासप,शिवसंग्राम,रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.राजूमामा भोळे यांनी पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करुन गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून जी.एम.फांउडेशनच्या क ार्यालयात कार्यकत्यांची गर्दी झाली होती. जी.एम.फांउडेशन ते तहसील कार्यालयापर्यंत शक्तीप्रदर्शन करुन आमदार राजूमामा भोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांच्याकडे दाखल केला.यावेळी पालकमंत्री ना.गिरीष महाजन,आ.चंदुलाल पटेल,डॉ.गुरुमुख जगवाणी,महापौर सीमा भोळे,उपमहापौर अश्‍विन सोनवणे,मनपा सभागृह नेते ललित कोल्हे,श्रीराम खटोड,श्रीकांत खटोड,शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,माजी महापौर नितीन लढ्ढा,सुनील महाजन,आरपीआयचे अ निल अडकमोल यांच्या महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.