मुंबई: भाजपच्या विधिमंडळ पक्षनेते पदाच्या निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षनेते पदासाठी ठेवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेबाबत भाष्य केले.
जनतेने भाजप-सेना महायुतीला कौल दिला असून पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. आज जरी वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी चर्चेमुळे विचलित न होण्याचा सल्ला देत राज्मयात हायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. सत्ता स्थापनेबाबत चढाओढ सुरूच असते तेच सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र हे फार काळ राहणार नसून लवकरच भाजप-सेना महायुती सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केले.