शिंदखेडा । काही समाज कंटकांकडून राष्ट्रपुरुषांचा अपमान व प्रतीमा विंटबंनाच्या घटना वारंवर होत असुन अशीच एक घटना चिखली जि.बुलढाणा येथे घटीत झाल्यामुळे समस्त क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याचा निषेध व समाज कंटकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, व पोलीस उपनिरीक्षकांना शिरपूर तालुका क्षत्रिय समाज बांधव व सर्व समाजबांधवांनी केली आहे.
चिखली येथील प्रतिमा विटंबनेची घटना
चिखली येथे झालेल्या महाराणांचा प्रतीमेची विटंबना करणार्याच्या विरोधात कठोर करवाई करण्याची विनंती करण्यात आली. सर्व समाज कंटकांचा शोध घेऊन समाजात विषमता पसरवणार्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शिवाय या घटनेमुळे समस्त क्षत्रिय समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाला महाराणा प्रतापांचा गौरवशाली इतिहासाचा विसर पडला का ? अशी विचारणा केली आहे. महाराणांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख शालेख अभ्यासक्रमात समावेश करुन येणार्या पिढीला त्यांच्या कार्यायाची जाणीव करुन द्यावी व ऐतिहासिक कार्यास उजाळा द्यावा या मुळे भविष्यात अश्या घटनांना आळा बसु शकेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. याप्रसंगी शिरपूर तालुका राजपूत समाज प्रतिनिधी उपस्थित होते. नगरसेवक राजु अण्णा गिरासे, चंदनसिंह राजपूत, हर्षलसिंह राजपूत, भुरा राजपूत ,जगतसिंह राजपूत, अंबालाल राजपूत, जयपासिंह गिरासे, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील, दिपक जमादार, भरत राजपूत, हेमराज राजपूत , राजु टेलर, डॉ.दिपक राजपूत, अमोल राजपुत,राज देशमुख,योगेश राजपूत,गजेंद्र राजपूत, यशपाल राजपूत, मनोज पाटील,धनसिंग राजपूत,सतिष गिरासे, अमोल राजपूत, महेंद्र राजपूत,आकाश राजपूत आदी उपस्थित होते.