महाराणा प्रताप चौक रस्ता बनला जीवघेणा

0

शहादा। शहरातील पटेल रेसिडेन्सी ते स्वामी समर्थ केंद्राजवळील महाराणा प्रताप चौक दरम्यान काँक्रीटचा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्यात ठिक ठिकाणी अक्षरशः जिव घेण्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. लोखंडी सळ्या बाहेर येवुन दोन महिने होत आले आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याबाबत शहरवासी आचर्य व्यक्त करीत आहेत. एखादा मोठा अपधात अथवा अनर्थ घडल्यास त्याला नगरपालिका प्रशासन जबाबदार रहाणार आहे. आता हा सारा प्रकार बघता नागरीकांचा संयम सुटला आहे.

लोखंडी सळ्या ठिक ठिकाणी रस्त्याचा मधोमध व वरती आल्या आहेत. वाहनधारकांना वाहन चालवतांना सावधानता बाळगावी लागत आहे. मात्र अंधार्‍या रात्री ज्याला रस्त्याची दुर्देशा माहिती नाही अशा एखाद्या मोटारसायकलस्वार वेगाने गेला तर मात्र अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या रस्त्याने शाळकरी मुले मुली सायकलीने ये जा करतातता. सळ्या चाकात घुसल्यास काय अनर्थ होवु शकतो याचा अंदाज करणे कठीण आहे. कमीत कमी रस्तांदुरुस्त करण्याची क्षमता नगरपालिकेत नसेल पण ज्या ज्या ठिकाणी लोखंडी सळ्या वरतीआल्या आहेत त्या तात्काळ तोडाव्यात सर्वत्र मोठ मोठाले खड्डे पडले आहेत ते भरावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहरात काही भागात रस्त्यांची कामे सुरु आहेत यामुळे ह्या रस्त्यावरील केवळ खड्डे तरी भरावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच नगराध्यक्ष व मुख्याधिकारीनी प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी होत आहे.