शहादा । शहादा तालुका राजपूत समाज मंडळातर्फे येत्या 28 मे रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराणा प्रताप चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी जि. प . उपाध्यक्ष जयपालसिंग रावल राहणार आहेत. मिरवणुकीचा शुभारंभ आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते केला जाणार आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राजपूत समाज मंडळाचे ज्येष्ठ संचालक किशोरसिंग गिरासे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्र रावल ,सरकारी वकील सुवर्णसिंग गिरासे ,नगरसेवक रविंद्र जमादार, मोड तालुका येथील उपसरपंच राजेंद्रसिंग गिरासे, सारंगखेडा येथील रणवीरसिंग रावल, प्रा. संजीव गिरासे ,प्रा .संजय जाधव ,पोलीस उपअधीक्षक महारू पाटील ,तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सह मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आव्हान अध्यक्ष संजय राजपूत, प्रतापसिंग गिरासे, सचिव देवेंद्रसिंग राजपूत सह संचालक मंडळाने केले आहे.