महाराणा प्रताप जयंतीनिमित्त महाआरोग्य तपासणी

0

नवापूर। वीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त ऑल इंडिया अ‍ॅण्टी करप्शन, क्राईम प्रिव्हेन्टीव अ‍ॅण्ड ह्युमन राईट्स कमिटी व सुयश हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्याक्रमाचा अध्यक्षस्थानी राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष संजय राजपूत तर उपाध्यक्ष चुनिलाल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे शिरिष नाईक, व माजी उपनराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले

25 रूग्णांना शस्त्रक्रीयेसाठी पाठविले मुंबईला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रमोद वसावे, पस उपसभापती दिलीप गावीत, राणा राजपूत समाजाचा महिला अध्यक्षा शिला पाटील, महाराणा प्रताप सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयसिंह राजपूत, जितेंद्र पाटील, नवापूर तालुका दैनिक पञकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील, नगरसेविका रिना पाटील,मेघा जाधव, अजय पाटील, हेमंत जाधव, शिरिष प्रजापत, नपा विरोध पक्ष नेता नरेंद्र नगराळे, रा. कॉ. पार्टीचे शहर अध्यक्ष शरद पाटील, वर्ग 3 कर्मचारी यूनियनचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, संजीव पाटील, संजय के पाटील, महाराणा प्रताप युवा सेनेचे अध्यक्ष छोटू पाटील, मनोहर नगराळे, श्याम चौधरी, विहीप बजरंग दलचे विभाग संयोजक राजु सोनी,लॉयन हार्ट ग्रुपचे अध्यक्ष राजु जाधव, जितेंद्र माची, बिरसिंग पाटील, संजय राणा, निलेश देसाई, भिकन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार प्रमुख समन्वयक विश्वनाथ पाटील, गणेश पाटील, केतन पाटील, शालिनी पाटील यांनी केला. प्रास्तविक विश्वनाथ पाटील यांनी तर सुत्रसंचालन सुनील पवार तर आभार गणेश पाटील यांनी मानले. तपासणी व सहकार्य डॉ. लता दिराश्री व डॉ धवल दिराश्री यांनी केले. या शिबीरात 240 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 25 रूग्णांना ऑपरेशनला मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.