चाळीसगाव । छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप या दोन राजांनी त्याग स्वाभिमान जपला. 30 वर्षे मोगल सलतनतशी संघर्ष करून लढा दिला, अशा महामानवांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले, पाहिजे असे प्रतिपादन चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचालक डॉ सुनिल राजपूत यांनी केले. महाराणा प्रताप जयंती निमित्त येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिरात रयत सेनेतर्फे आयेाजित व्याख्यानात ते बोलत होते. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. यात चाळीसगाव शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
विचार रूजविण्याचे कार्य करा
चाळीसगावात कार्यक्रमाचे आयोजन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले होते. दोघा राजांनी कधीही जातीपाती चे राजकारण केले नाही देशामध्ये समाजाला न्याय दिला त्यांचे शौर्य खरोखर वाखाणण्याजोगे होते युवा पिढी ने फक्त मिरवणूका काढुन चालणार नाही तर त्यांचे विचार रुजविण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहन डॉ. राजपूत यांनी व्याख्यानात केले. जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, गणेश पवार, माजी जिल्हा परीषद सदस्य सुभाष चव्हाण, नगरसेविका विजया पवार, नगरसेवक मानसिंग राजपुत, माजी नगरसेवक प्रदीप, राजपुत, बबलु राजपुत, संग्रामसिंग राजपुत, संतोष राजपुत, गोरख साळुंखे, सतिश पवार, अतुल घाडगे, निंबा पाटील. रयत सेनेचे संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिपक राजपुत, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सप्निल गायकवाड, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पवार, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, शहर उपाध्यक्ष सुनिल निबाळकर, गणेश देशमुख, अनिकेत शिंदे, गौरव पाटील, ऋषीकेष चौधरी, तेजस गवळी, दिपक सांगळे, शुभम पाटील, संतोष मांडोळे, रविंद्र पवार, गौरव शिंदे, सप्निल देवरे, मोहन भोई, पवन पाटील यांच्यासह महाराणा प्रताप मित्र मंडळाचे प्रवीण राजपुत, श्रीकांत राजपूत, पप्पू राजपुत, विशाल राजपुत, घारु राजपुत, सोमनाथ राजपुत, प्रदीप राजपुत, निलेश राजपुत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगाव पंचायत समिती
चाळीसगाव पंचायत समिती कार्यालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेंद्र महीरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक लेखा अधिकारी आर एस बेलदार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एम बी गांगुर्डे, के व्ही मालाजंगम, कनिष्ठ सहाय्यक राजु तागवाले, वाल्मिक निकम, सागर पवार, रविंद्र कुंभारे, राजु महाजन आदी उपस्थित होते.
महाराणा प्रताप एक स्वाभिमानी राजे
महाराणा प्रतापसिंह यांनी सम्राट अकबरा समोर आपले शिर झुकविले नाही, अकबराला ही महाराणा प्रतापसिंहंचा स्वाभिमान मोडता आला नाही. म्हणून महाराणा प्रतापसिंह हे एक स्वाभिमानी राजे होते, असे प्रतिपादन डॉ बालाजी जाधव यांनी केले. राजपुत मंगल कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राजपुत मंगल कार्यालय ट्रस्ट अध्यक्ष ठानसिंग राजपुत, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संचालक डॉ सुनिल राजपुत, उमंग संस्थेच्या संपदा पाटील, महिला आयोग देवयानी ठाकरे अंपग संस्थेच्या मिनाक्षी निकम, नगरसेविका सविता राजपुत, नगरसेवक रामचंद्र जाधव, दिपक पाटील मानसिंग राजपुत, रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार,दिपक राजपुत, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, भारत मुक्ती चे मुकेश नेतकर, जयश्री रणदिवे,आयोजक अभयसिंह राजपुत उपस्थित होते.
भव्य रॅली
महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अनेक तरूणांचा यात सहभाग होता. पाटीलवाडा स्थित जंगदबा व्यायाम शाळा येथून महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. तेथून रॅली महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी मार्गे धुळे मालेगाव रोड महाविद्यालय वाय पॉईंट रेल्वे उड्डाण पुल कोर्टा जवळुन शासकीय विश्राम गृहापासुन निघाली. चामुंडा माता मंदिराजवळ रॅलीचा समारोप करण्यात करण्यात आला. यात प्रवीण राजपुत, श्रीकांत राजपूत, पप्पू राजपुत, दिपक राजपुत, विशाल राजपुत, घारु राजपुत, सोमनाथ राजपुत, प्रदीप राजपुत, निलेश राजपुत, प्रेमसिंग राजपुत, जयदीप गागुर्डे आदी सहभागी झाले होते.