महाराणा प्रताप जयंती निमित्त शोभायात्रा

0

अमळनेर। महाराष्ट्रात दरवर्षी महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील महाराणा प्रताप यांची जयती साजरी केली जाणार आहे. अमळनेर येथील राजपूत एकता मंचतर्फे रविवारी 28 रोजी विर शिरोमनी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शोभायात्रा व मोटर सायकल रॅलीचे आयोजन अमळनेर शहरात करण्यात आले आहे. मागील वर्षी सर्व समाज बांधवांनी महाराणा प्रताप जयंती साजरी केली होती. यावर्षी केल्या जाणार्‍या जयंतीची पुर्ण तयारी करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींसह राजकीय नेते राहणार उपस्थित
रविवारी दुपारी 3 वा विश्राम गृहाजवळील महाराणा प्रताप चौकातून मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वा महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शोभयात्रेस प्रारंभ होणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधीसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती राहणार आहे. स्टेशन रोड, स्टेट बँक, सुभाष चौक, पाच कंदील, दगडी दरवाजा, बस स्टँड मार्गे शोभायात्रा पुन्हा महाराणा प्रताप चौकात येणार आहे. शोभा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंच तर्फे करण्यात आले आहे.