महाराणा प्रताप यांना अभिवादन

0

धुळे/तळोदा। हिंदुकूलरत्न महाराणा प्रतापसिंह यांच्या 477 व्या जयंती निमित्त धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराणा प्रतापसिंग यांची जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोटरसायकल रॅली आदींचे आयोजन करण्यात आले होते.

धुळे। शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ व इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे पहाटेपासुन आयोजन करण्यात आले होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त पहाटे 3 वाजता अभिषेक, सकाळी 7 वाजता माल्यार्पण व रक्तदान शिबीर त्यानंतर सकाळी दहा वाजता भव्य मोटारसायकल रॅली महाराणा प्रताप पुतळ्यापासून प्रारंभ होऊन झाशी राणी पुतळा, राजवाडे बँक, टॉवर गार्डन, जे.बी.रोड, आग्रा रोड, फुलवाला चौक, गांधी पुतळा, देवपूर नेहरू नगर, जयहिंद सिनीयर कॉलेज, जयहिंद शाळा, गणपती पूल, संतोषी माता चौक येथून महिंदळे येथे विसर्जित करण्यात आली. सायंकाळी 4 वाजता महाराणा मंगल कार्यालयासह मनोहर चित्रमंदिरापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली.

शिरपूर शहरासह परिसरात महाराणा प्रताप जयंती साजरी
शिरपूर । शहरात व अमोदे गावात मोठ्या उत्साहात व जल्लोशात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी युवकांची मोटार सायकल व जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातीत महाराणांच्या प्रतिमेंचे पुजन करण्यात आले. सायंकाळी राजपूत वाडा परिसरातुन मेन रोडवरुन अमोदे गावातून शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावात नुतन स्थापीत करण्यात आलेल्या महाराणांच्या पुर्णाकृती पुतळ्यााचे अनावरण व पुजन करण्यात आले. अमोदा येथील प्रांगणात कार्यक्रमाचे निमित्ताने व्याख्यान व सांगता करण्यात आली. सुरुवातीत युवा केतन राजपुत याने आपल्या ओजस्वी वाणी ने देशभक्ती व विर सावरकरांची कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते राजपूत समाजाच्या इतिहाचे गाढ अभ्यासक व शिरपूर तालुक्याचे गौरव जयपाल गिरासे यांनी राजस्थान के जोहर और साके या विषयावर प्रकाश टाकला.जगात भारताची संस्कृती श्रेष्ठ असुन इतिहासातील विर गाथा,पराक्रम शौर्य व बलीदान व देशभक्तीची परंपरा यामुळे भारत भुमी जगाला आदर्श देते.

महाराणांचा जीवनपट उलगडला
महिला शक्तीचे अतुलनिय योगदान व राणी पद्मावती यांचे जिवन चरित्र व गौरवशाली इतिहाच्या अनमोल क्षणांचा दाखला या वेळी दिला. महाराणांच्या जिवनपट सर्व समाजांना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची शैली, पराक्रम व शौर्याची जाणीव व्याख्यानातुन करण्यात आली. या प्रंसगी तालुक्यातील सर्व समाज बांधव सर्व समाजातील मान्यवर व लोप्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. नरेंद्रसिंह सिसोदिया, मानव एकता पार्टीचे जितेंद्रसिंह जमादर, प्रसन्ना जैन, डॉ.जितेंद्र ठाकुर, रोहित रंधे, राजु सोनवणे, किशोर माळी, पिंटू माळी,चंदनसिंह राजपूत, राजुअण्णा गिरासे, देवेंद्र राजपूत, हर्षल गिरासे,राज देशमुख,रणजितसिंह राजूपत,जगदिश राजपूत,अंबालाल राजपूत,नितीन गिरासे, जितेंद्र गिरासे,दिपक जमादार, जगतसिंह राजपूत, नितेंद्र राजपूत, कल्पना राजपूत, धनसिंग राजपूत, योगेंद्र सिसोदिया, राज सिसोदिया, डॉ.दिपक गिरासे,अमोदे गावातील सर्व तरुण व युवक सरपंच उपसरपंच व महिला व समाज बांधव विविध समाजातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भरतसिंह राजपूत यांनी केले. आभार रत्नदिप सिसोदिया व उत्सव समिती अध्यक्ष अंबालालसिंह राजपुत यांनी मानले.