जळगाव । महाराणा प्रताप हे सर्वसामान्यासाठी लढले म्हणून ते कोणत्या एका समाजाचे नसून सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांचे कार्य हे सर्व समाजासाठी व सर्व धर्मासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अॅड.रामहरी रूपनवर यांनी सांगीतले. सोमवारी 28 रोजी महाराणा प्रताप जयंतीनिमीत्त क्रांतीसुर्य महाराणा प्रताप बहुउददेशीय संस्थेतर्फे आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी स्मारक हे नवीन पिढीचे प्रेरणास्त्रोत असून हा ठेवा जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.जी.एन.पाटील, सचिव विनोदसिंग शिंदे, खजिनदार लौटन कौतीक पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, महानगरअध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी, सेवादल अध्यक्ष राजस कोतवाल, अॅड रविंद्रसिंग जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय वराडे, बेहनर नाना टेलर, वाय.डी.पाटील, ज्ञानेश्वर कोळी, संचलाल बोराडे, महेंद्रसिंग पाटील, अरविंदसिंग पाटील, अतुल विरभाटकर, भावलाल नामदेव पाटील आदी उपस्थित होते.