महाराणी पद्मावतींच्या जीवनाबाबत चुकीचे चित्रण

0

धुळे । महाराणी पद्मावतीचे चुकीच्या पद्धतीने चित्रिकरण करुन इतिहासाची छेडछाड करण्यात आली आहे. ज्या महाराणीच्या बलीदानाला आजही राजस्थानात चितोडगड येथे जोहर (सती) या प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कारण परकीय देशाचे आक्रमण झाल्यानंतर पराभूत हिंदू राजपूत राजांनी व राणींनी आत्मसमर्पण न करता जळत्या अग्नीकुंडात 16 हजार स्त्रीयांसाठी सती (जोहर) जाऊन आपल्या देश व क्षत्रीय समाज त्यागाची व बलीदानाची परंपरा कायम ठेवली होती. ती आजही कायम आहे. त्यांच्या ह्या बलिदानाचे व इतिहासाचे दिग्दर्शकाने चुकीचे चित्रीकरण करुन संपूर्ण स्त्री जातीचा व महिलांचा अपमान केला आहे.

कायमची बंदी घालण्याची मागणी
भारत सरकारने या चित्रपटामध्ये हस्तक्षेप करुन स्त्री जातीच्या सन्मानासाठी व सर्व सामान्यांच्या भावनेचा विचार करुन या चित्रपटावर कायम स्वरुपाची बंदी घालावी. निर्मात्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला तर पुन्हा अशी कोणाची इतिहासात छेडछाड करण्याची हिंमत होणार नाही, असे म्हणत राणाप्रताप चौकात पुतळा दहन करण्यात आले. यावेळी नाना कदम, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, कोमल अभाळे, दिनेश काळे, मनोज राजपूत, नितीन पाटील, डॉ. अब्दुल काजी, अकबर पिंजारी, यश राणा, अ‍ॅड. जावळे, सुरेश विसपुते, अनिकेत थोरात, विक्की जाधव, प्रदीप काळे, प्रल्हाद पाटील, किरण भालेराव आदी उपस्थित होते.