महाराष्ट्राचा शेतकर्‍यांसाठी मदतीचा आखडता हात

0

मुंबई । महाराष्ट्र सरकार शेतकर्‍यांच्या बाबतीत मदतीचा हात आखडता घेत असून त तुलनेत शेजारच्या राज्यांनी शेतकर्‍यांच्या खिशात बर्‍यापैकी रक्कम टाकली आहे. महारार्ष्टातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे आढळून आले आहे. शेतीसाठी यंदा महाराष्ट्र सरकारने आपली अर्थसंकल्पीय तरतूद 8.4 टक्क्यांनी घटवली आहे. तुलनेत महाराष्ट्रात शेतकर्‍यांना थेट आर्थिक लाभ देणार्‍या योजनांचा अभाव दिसतो.

महाराष्ट्रात वर्षात 3661 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
महाराष्ट्राने शेतकर्‍यांसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफी केली तर 21789 कोटी अर्थसंकल्पात तरतूद केली. शेतकर्‍यांच्या विकासावर एकूण 55,789 कोटी रुपये राज्याचा खर्च सरकरारी आकड्यात निदर्शनास येतो. प्रत्येक खातेदार शेतकर्‍यामागे 41 हजार रुपये हा खर्च आहे. सन 2016 मध्ये महाराष्ट्रात एकूण 3661 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.

तेलंगना आणि गुजरातमध्ये कमी आत्महत्या
याउलट तेलंगणाची आकडेवारी पाहिली तर तेलंगना सरकारने शेतकर्‍यांसाठी 17 हजार कोटींची कर्जमाफी केली. शेतकर्‍याच्या हितासाठी 12845 कोटी अर्थसंकल्पात तरतूद केली. शेतकर्‍यासाठईचा एकूण 29,845 कोटी रुपये राज्याचा खर्च निघतो त्यानूसार प्रत्येक शेतकर्‍यामागे 41.4 हजार रुपये तेलंगना सरकारने खर्च केला. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगनामध्ये शेतकरी आत्महत्येचा आकडा कमी आढळतो. सन 2016 मध्ये तेलंगनात एकूण 645 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तर गुजरातमध्ये सन 2016 मध्ये एकूण 408 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या.